जीवन हा एक प्रवास आहे. जन्म झाल्यापासून ते मृत्यू पर्यंत हा प्रवास वेगवेगळी वळणे घेत पुढे जातो!यात एक अतिशय सुंदर वळण येतं जे एका जीवाला जन्म देतच पण आणखी दोन जीव सुद्धा नवा जन्म घेतात!बरोबर!पालकत्व हे ते वळण! हा प्रवास म्हणजे जबाबदारी असते तशी ती एक प्रयोगशाळा सुद्धा असते!
आई बाबा आणि मूल यांचा एकत्र प्रवास आता सुरू होतो!या प्रवासात काही वेळा समस्या जाणवते, प्रश्न पडतात आणि मग तो त्रासाचा वाटू लागतो!असं न होता हा प्रवास सुखाचा कसा होईल यासाठी केलेला हा एक प्रयत्न!
To Book your Copy call on 8087873761 OR 0 8180 952595
Read Moreया दिनदर्शिकेत आपण मराठी महिने आणि त्या महिन्यात येणारे ऋतू सांगितले आहेत. कोणत्या मराठी महिन्यात कोणता सण येतो हे आपल्याला सांगते ती तिथी! चंद्राची वाढणारी आणि कमी होणारी कोर आपल्यला सांगते की हा पक्ष कोणता आहे?म्हणजे अमावास्येचा दुसरा दिवस असतो प्रतिपदा!पौर्णिमेला पूर्ण चंद्र आकाशात दिसतो या दरम्यानच्या पंधरा दिवसांना आपण शुक्ल किंवा शुद्ध पक्ष म्हणतो पौर्णिमा ते अमावस्या या काळात चंद्र लहान लहान होताना दिसतो आणि अमावास्येला आकाशात आपल्याला चंद्र दिसत नाही. या पंधरा दिवसांच्या काळाला कृष्ण पक्ष असे आपण म्हणतो! या पंधरा दिवसांना प्रतिपदा द्वितीया तृतीया अशी नावे दिली आहेत.
January
गणेश जयंती
ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनाम् उपमश्रवस्तमम् |
ज्येष्ठ राजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पते आ न: शृण्वन् ऊतिभि: सीद सादनम् || ऋग्वेद २.२३.१.
महाराष्ट्रातील एक महान संत समर्थ रामदास, यांनी त्यांच्या जीवनातील अनुभवाच्या आधारे मनाच्या श्लोकांच्या माध्यमातून शिकवणूक दिली. समर्थांचे शिष्यगण घरांच्या समोर जाऊन मोठ्याने एक श्लोक म्हणत आणि “जय जय रघुवीर समर्थ” अशी आरोळी देत. घरातली माऊली येऊन त्यांना भिक्षा देत असे. अशाप्रकारे विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन चालायचे, अभ्यास चालायचा.
मनाच्या श्लोकांमधून आपण आपल्या जीवनात कसे वागावे, आपले आचरण कसे असावे, आपले विचार कसे असावेत, आपण इतरांच्या कसे उपयोगी पडावे अशी सारी शिकवणूक मिळतेच. शिवाय विवेक वैराग्य ज्ञान मिळते.
January
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा |
नमू शारदा मूळ चत्वार वाचा
गमू पंथ आनंत या राघवाचा||